दीपाली सय्यद मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; शिंदे गटात करणार प्रवेश?

Deepali Sayyad Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद या गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होत्या. त्या चर्चांना आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट होणार आहे.

काही दिवसांपूर्वीही दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू होती. आपण लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करू, असे सय्यद यांनी म्हंटले होते. दरम्यान सय्यद नाराज असल्याच्या चर्चाही केल्या जाऊ लागल्या. या दरम्यान आता सय्यद यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याकडून शिंदेची भेट घेतली जाणार आहे.

सध्या ठाकरे गटात नाराज असलेल्या सय्यद या आज मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर त्या आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.