पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा पराभव; भाजप विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे. उत्पल परिकर यांनी पणजी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. मात्र उत्पल पर्रीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे बाबुश मोन्सरात यांनी विजय मिळवला आहे.

उत्पल पर्रीकर यांचा 710 मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे बाबुश मोन्सरात यांनी त्यांना पराभवाचा झटका दिला आहे. उत्पल पर्रीकर यांनी भाजप विरोधात बंड पुकारत पणजीतून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अन्य पक्षांनी देखील उत्पल यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उत्पल पर्रीकर बाजी मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून निवडणूक लढवल्या नंतर गोव्यात राजकीय रंगत आली होती. उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप विरोधी पक्षांना आवाहन केले आहे. पणजीतून उत्पल पर्रीकर हेच विजयी होतील असा दावा संजय राऊत हे सातत्याने करत होते. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. गोव्यात आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजप 19 तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. मगोप ला 5 जागांवर आघाडी मिळाली असून आम आदमी पार्टी 1 जागांवर आघाडी आहे.

Leave a Comment