“हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त पदरात काही पडले नाही”; गोव्यातील निकालावरून भातखळकरांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या  निवडणुकीत प्रचारदरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेनेकडून भाजपला चांगलेच टार्गेट करण्यात आले होते. अखेर या ठिकाणी आज निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. “वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही पदरात काही पडलेले नाही, फक्त पाव टक्के मतं. तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच…” असे त्यानी म्हंटले आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमधे म्हंटले आहे कि, “वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही पदरात काही पडलेले नाही, फक्त पाव टक्के मतं.तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच…,” असा टोला यावेळी त्यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

 

किती मिळाली आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मते?

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. कारण 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?
आप {6.78%}
तृणमूल काँग्रेस {4.89%}
भाजप {33.60%}
गोवा फॉरवर्ड पक्ष {1.14%}
काँग्रेस {23.54%}
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष {8.60%}
राष्ट्रवादी {1.06%}
नोटा {1.17%}
शिवसेना {0.25%}
इतर {18.98%}

Leave a Comment