व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘अग्निपथ’ योजने अंतर्गत दरवर्षी 50 हजार अग्निविरांची भरती करणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली असल्याचे मंत्री राजनाथ सिह यांनी सांगितले.

मंत्री राजनाथसिह यांनी केलेल्या घोषणेनुसार चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या 80 टक्के तरुणांची सेवा समात्प केली जाणार आहे. उरलेल्या 20 टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याच पुन्हा संधी मिळणार आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने आज ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे, भारतीय सैन्यातील सरासरी वय 35 वर्षांवरून 25 वर्षांपर्यंत कमी होईल. अग्निपथ योजनेंतर्गत लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये पहिल्या वर्षी 25 हजारांहून अधिक तरुणांची भरती होऊ शकते.

ही योजना यशस्वी झाल्यास सरकारचे पगार, भत्ते आणि पेन्शनसाठी हजारो कोटी रुपयांची बचत होईल, असा सशस्त्र दलाचा अंदाज आहे. अग्निपथ योजना तयार करण्यापूर्वी लष्करी व्यवहार विभागाने 8देशांमध्ये लागू केलेल्या समान मॉडेल्सचा अभ्यास केला आहे.