ट्रम्प दाम्पत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादकर तयार; होर्डिंग्जने वेधले लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मेलोनिया ट्रम्प यासुद्धा भारतात येतील. या दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरु आहे. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प कुटुंबीय भारतात असतील. व्यापार, सुरक्षा आणि आर्थिक बाबींवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. भेटी देणाऱ्या महत्वाच्या दोन ठिकाणी म्हणजेच दिल्ली आणि अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी परिसर सुशोभित करण्यात आला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित ट्रम्प दाम्पत्यांचे मोठमोठाले होर्डिंग्ज लक्ष वेधून घेत आहेत.

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. शनिवारी सुरक्षा परिमानांची अंतिम टप्प्यातील पाहणी करण्यात आली. दोन बलाढ्य राष्ट्र आणि एक महान मैत्री असा संदेशही होर्डिंग्जच्या माध्यमातून देण्यात आला आहे. रस्त्या रस्त्यांवर भारत आणि अमेरिकेचे झेंडे दिसत आहेत. या सर्व कार्यक्रमानिमित्त मोदींची प्रतिमाही उजळून निघाली असून याच प्रतिमेचा फायदा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना होईल असं मानलं जात आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाची आता सर्वच भारतीयांना उत्सुकता लागलेली आहे एवढं मात्र नक्की..!!

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment