दिल्लीतील हिंसाचार आटोक्यात येत नसेल तर लष्कराला बोलवा- केजरीवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर प्रतिकिया दिली आहे. दिल्लीच्या हिंसा प्रभावित भागात सैन्य बोलावून कर्फ्यू लावावा यासंदर्भात आपण गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याविषयी ट्वीट “मी रात्रभर बर्‍याच लोकांशी संपर्क साधत आहे … परिस्थिती चिंताजनक आहे … सर्व प्रयत्न करूनही पोलिस परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आणि आत्मविश्वास वाढविण्यात अपयशी ठरले आहेत”…. सैन्य बोलावले जावे, आणि हिंसाग्रस्त भागात कर्फ्यू लागू करण्यात यावा. मी या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहित आहे … “

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी हमी देतो की कायद्याचे पालन करणाऱ्या कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा होऊ देणार नाही. हिंसाग्रस्त भागात पुरेसे सैन्य तैनात केले आहे, कोणीलाही घाबरून जाण्याची गरज नाही. लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा.”

काल मंगळवारी ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा २० वर गेला आहे. सध्या वातावरण तणावपूर्ण असून काल रात्री अजित डोभाल यांनी जाफराबाद, सीलमपूर आणि ईशान्य दिल्लीतील इतर भागांचा दौरा केला. तेथे त्यांनी विविध पंथांच्या नेत्यांशी संवाद साधला. राजधानीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्याची परवानगी कोणालाच दिली जाणार नाही आहे असं डोभाल यांनी स्पष्ट केले आहे. परिस्थितीवर नियंत्रण जाण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त आणि निमलष्करी दलाची पर्याप्त संख्या तैनात करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात जाण्यासाठी पोलिसांना पूर्ण सूट डोभाल यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment