हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशावर कोरोनाच संकट आहे. अशा वेळी देशातील डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी ही सर्व मंडळी जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत. करोनाच्या विरोधातील लढाईत लढणाऱ्या अशा योध्यांसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. कर्तव्य बजावताना वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी सरकारी रुग्णालयातील असोत किंवा खाजगी संस्थेतील, अशा सर्वांनाच या निर्णयाचा लाभ होईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
करोनाच्या लढाईत सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून यात डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्याप्रमाणेच सॅनिटेशन कर्मचारीही महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. यांपैकी कुणाला करोनाची लागण होऊन त्यात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. करोनाच्या लढाईत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिल्ली सरकार पूर्णपणे काळजी घेईल, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली. केजरीवाल सरकारच्या या निर्णयाचा लाभ डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचाऱ्यांना होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण
खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी
कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित
निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली
‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा