पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला ‘टूलकिट प्रकरणात’ अखेर जामीन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला ‘टूलकिट प्रकरणात’ अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या सत्र न्यायालयानं दिशाला जामीन मंजूर केलाय. दोन जामीनपत्रासहीत १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यासहीत दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याअगोदर दिशा रवि हिला पहिल्यांदा पाच दिवस तर दुसऱ्या वेळेस तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांकडून दिशाच्या पाच दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली. याचा दिशाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं दिशाला एका दिवसाच्या पोलीस रिमांडवर धाडलं होतं. एक दिवसाच्या पोलीस कोठडीत दिशा रवि हिची सायबर सेलच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली.

या अगोदर झालेल्या सुनावणीत, दिशा खलिस्तान समर्थकांसोबत मिळून टूलकिट तयार करत होती. तसंच ती भारताची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नात होती, शेतकरी आंदोलनाच्या आडून देशात अशांती निर्माण करण्याच्या आंतरराष्ट्रीय कटाचा ती एक भाग होती. तिने ई-मेल सारखे पुरावेही मिटवण्याचा प्रयत्न केला, असं दिल्ली पोलिसांनी कोर्टासमोर सांगत दिशाचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment