नवी दिल्ली । दिल्लीमध्ये घातापाताचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर साठा जप्त केला आहे. हे सर्व जण दहशवादी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील दोन जण पंजाब तर तीन जण काश्मीरचे आहेत. शस्त्र तसेच इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे”. या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा होती अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे
रविवारी कुपवाडा येथील गुलगाम परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन करून 5 किलो स्फोटकं, 2 डेटोनेटर्स आणि 2 पोस्टर्स हस्तगत केली आहेत. त्यामुळे पुढे होणार घातपात टळला आहे. सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला देखील केला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे.
Delhi: Visuals from Shakarpur where five persons have been arrested following an encounter. According to Delhi Police, the group was backed by ISI for narcoterrorism. pic.twitter.com/X4dc4Q0xfT
— ANI (@ANI) December 7, 2020
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’