Fact Check: दिल्लीत आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावला खलिस्तानी झेंडा? ‘हे’ आहे सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या ६२ दिवसांसून दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारच्या कृषी कायदयविरोधात शेतकरी शांतीपूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी नियोजित मार्गावरून थेट दिल्लीत शिरले आहेत. या दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत.आंदोलकांनी बॅरिकेटस सोडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक मारली. तसेच लाल किल्ल्यावर एक झेंडा फडकवला. त्यानंतर, सोशल मीडियावर रान उठवलं गेलं. आंदोलकांनी तिरंगा झेंडा उतरवल्याचा आरोप काही जणांनी केला, तर लाल किल्ल्यावर खलीस्तानी झेंडा फडकवल्याचेही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, आंदोलकांनी या दोन्हीही कृती केल्या नाहीत.

आंदोलकांनी खलीस्तानी ध्वज लाल किल्ल्यावर फडकवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकवलेला ध्वज खलिस्तानी नसून तो शीख धर्मियांचा धार्मिक ध्वज आहे. या ध्वजाला निशाण साहिब असं म्हणातात. खलीस्तानी झेंड्यावर खलीस्तान असा स्पष्ट उल्लेख असतो, त्यामुळे तो दावा खोटा असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलंय. तसेच, आंदोलकांनी तिरंगा ध्वज हटविल्याचेही सांगण्यात येते. मात्र, आंदोलकांनी रिकाम्या खांबावरच हे निशाण साहिब फडकवले असून लाल किल्ल्यावर तिरंगा डौलाने फडकत असल्याचे दिसत आहे.

नेटकर्‍यांनी एएनआय वृत्तसंस्थेचा व्हिडीओ शेअर करून दावे केले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आंदोलक एका खांबावर चढून झेंडा फडकावताना दिसत आहे. या खांबावर कुठलाही झेंडा नव्हता. आंदोलकानी या खांबावरील कुठलाही झेंडा काढलेला नव्हता. लाल किल्ल्यावर सर्वात उंचीवर तिरंगा फडकताना दिसत आहे. या झेंड्याशी कुठल्याही आंदोलनकर्त्यानी छेडछाड केल्याचे कुठेही दिसत नाही. इंडिया टुडेच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराने या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच, द न्यूज मिनट या वेबसाईटनेही असेच म्हटलंय.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’