लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी नाही तर पंतप्रधान मोदींचाच माणूस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. अनेक ठिकाणी मोदी सरकारने शेतकर्‍यांवर लाठिचार्ज केला. काही लोकांनी लाल किल्यात प्रवेश करुन झेंडा फडकवल्याची दृश्यही माध्यमांमध्ये दाखवली गेली. यानंतर शेतकर्‍यांबाबत निगेटिव्ह वातावरण निर्माण झाले. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दीप सिद्धू शेतकरी नाही तर भाजपचाच कार्यकर्ता असल्याचा खुलासा शेतकरी नेते राकेश टिकैट यांनी केला आहे.

दीप सिद्धू हे शीख नसून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. पंतप्रधानांसमवेत त्यांचे एक चित्र आहे. ही शेतकर्‍यांची चळवळ आहे आणि तशीच राहील. काही लोकांना त्वरित हे ठिकाण सोडले पाहिजे – ज्यांनी बॅरिकेडिंग मोडली आहे ते कधीही चळवळीचा भाग होणार नाहीत असे राकेश टिकैट यांनी सांगितले.

दरम्यान, लाल किल्ल्यावर ज्यांनी हिंसा केली आणि ध्वज फडकवून तणाव निर्माण केला त्यांना त्यांच्या कर्माची किंमत मोजावीच लागेल. गेल्या दोन महिन्यांपासून एका विशिष्ट समुदायाविरूद्ध कट रचले जात आहेत. ही शीखांची चळवळ नाही, तर शेतकरी चळवळ आहे असे राकेश टिकैट यांनी म्हटले आहे. तसेच ट्रेक्टॉर रॅली वेळी अशिक्षित लोक ट्रॅक्टर चालवत होते, त्यांना दिल्लीचा मार्ग माहित नव्हता. प्रशासनाने त्यांना दिल्लीकडे जाण्याचा मार्ग सांगितला. ते दिल्लीला गेले आणि घरी परत आले. त्यातील काही लोक नकळत लाल किल्ल्याकडे वळले. पोलिसांनी त्यांना परत येण्यासाठी मार्गदर्शन केले असंही राकेश टिकैट यांनी म्हटले आहे.

Leave a Comment