हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासून एकूण ४ मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. यात इंटेलिजन्स ब्युरो(आयबी) या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अंकित शर्मा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी अंकित यांचा मृतदेह चांदबाग परिसरातील एका नाल्यात आढळून आला.
अंकित हे चांदबाद परिसरातील रहिवासी असून ते हरवले असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केली होती. दरम्यान, काल संध्याकाळी अंकित यांचा मृतदेह चांदबाग भागातील पुलया येथील एका नाल्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांचा दगडफेकीत मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.
ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर आणि चांदबागेत सुरू असलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तर, या हिंसाचारात सुमारे २०० लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पोलिस दलातील जवानाचाही समावेश आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. delhi-violence-body-of-intelligence-bureau-officer-ankit-sharma-found-in-drain-of-north-east-districts-chand-bagh