Wednesday, February 1, 2023

हिदुंत्ववादी संघटनांची मागणी : भारत देशाच्या विरोधात घोषणा देणाऱ्यावर देशद्रोहाचे कलम लावा

- Advertisement -

कराड | भारतीय तपास यंत्रणा व भारत देश या विरोधात चिथावणी देणाऱ्या विरोधात UAPA व देशद्रोहाचे कलम लावून कारवाई करावी. तसेच त्या व्हिडिओ मध्ये जे देशद्रोही आहेत, त्यांची घरे बुलडोजर पाडण्यात यावी. तसेच त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी केली आहे.

कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना भाजपाचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,  दि. 22/09/2022 रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथक (महाराष्ट्र) यांच्या पथकाने संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात छापे मारून दहशतवादाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली शंभराहून अधिक व्यक्तींना अटक केली आहे.

- Advertisement -

याच संदर्भात कोंढवा (पुणे) येथे पीएफआय या संघटनेच्या कार्यालयावर छापे मारून काही व्यक्तींना अटक केले आहे. यानंतर बंड गार्डन पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेकायदा जमाव जमवून काही व्यक्तींना राष्ट्रीय तपास यंत्रणा व एटीएस विरोधात वक्तव्य करून नागरिकांना चिथावणी दिल्याचे वेगवेगळ्या व्हिडिओ मधून आमच्या निदर्शनास आले. तसेच याच व्हिडिओ मध्ये काही व्यक्ती पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचे देखील स्पष्ट होत आहे यासंदर्भात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी बातमी देखील दिले आहेत हे चिंताजनक आहे. तरी, या सर्व प्रकारची सखोल चौकशी व्हावी.