मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या १ मार्चला मुंबई येथे होणाऱ्या सभेला शिवाजीपार्क मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला, त्यामुळे आता ही सभा एमएमआरडीए मैदानावर होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
शिवसेना, मनसे आणि भाजप यांना मैदान मिळते मात्र काँग्रेसला दिले जात नाही असा आरोप काँग्रेस ने केला आहे. महाराष्ट्रात धुळे आणि मुंबई येथे १ मार्चला राहुल गांधी सभा घेणार होते .त्यामुळे शिवाजीपार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र मैदान न मिळाल्यामुळे सभा दुसरीकडे घेतली जाणार आहे. सर्वांना मैदान मिळते मात्र आम्हाला मिळत नाही असे आरोप चव्हाण यांनी केले.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी महाआघाडीत मनसेला न घेण्याचा निर्णय सांगितलं. महाआघाडी समविचारी पक्षांची आहे, मनसेचे विचार वेगळे असल्याने त्यांनी महाआघाडीत काँग्रेसने प्रवेश नाकारला असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाचे –
महाआघाडीत ‘मनसेला’ प्रवेश नाही
शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांचा राडा