हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काळ एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री ठाकरेंचं ऐकत माहिती. त्यांनी त्यांचं ऐकावं असे म्हंटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनतर महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुढे आमचं काही चालत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमात आपल्या नाराजीचे दर्शन घडवले त्याबरोबर त्यांनी कबुलीही दिली. कार्यक्रमातील निवेदिकेच्या सूचनांमुळे अजित पवार यांच्यासह सर्वच उपस्थितांना वारंवार खुर्चीवरुन उठ-बस करावी लागत होती.
कार्यक्रमप्रसंगी पवार भाषण करण्यास उठले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात म्हंटले की, “निवेदिकेने एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांना बसा-उठा करायला लावले. मुख्यमंत्री ज्या ज्या वेळी उठायचे त्यामुळे आम्हाला सुद्धा उठावं लागत होतं आणि बसावं लागत होतं. एकदाचं सांगितलं असतं तर सर्व संपल असत. पण मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही.” अजित पवारांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता याची चर्चा रंगू लागली आहे.