समाजकारण – राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ यशवंतराव चव्हाणांनी घालून दिली : उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

https://fb.watch/ox8BLRC0yq/?mibextid=Nif5oz

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली.