सारथी बंद होणार नाही! उद्याच ८ कोटींचा निधी दिला जाईल; अजित पवारांची घोषणा

0
29
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सारथी संस्थेसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसरकारमार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सारथी संदर्भात राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला. “सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून मराठा सामाज्याच्या विकासाठी या संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात होती या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत संस्थेच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

“सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनामध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील,” असं अजित पवार म्हणाले.

“माझ्या हॉलमध्ये सगळी लोक बसू शकत नाही. त्यामुळे हॉलमध्ये गेलो होतो. पण, चांगला निर्णय घेणं महत्त्वाचं की त्याला वेगळे फाटे फोडायचे हे तुम्ही बघा. दर २ महिन्यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. सारथी संस्था चांगल्या पद्धतीनं काम करेल. आजच्या बैठकीत त्या अनुषंगानं सकारात्मक चर्चा झाली आहे. सारथी संस्थेनं केलेला सगळा खर्च संस्थेच्या संकेतस्थळावर देण्याची सूचना केली आहे,” असं अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here