व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वाद असूनही WhatsApp ने पुन्हा रिलीज केली नवीन प्रायव्हसी पॉलिसी, पर्सनल चॅट सिक्रेट ठेवण्याचा केला दावा

नवी दिल्ली । वाद असूनही फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) पुन्हा एकदा आपली नवीन पॉलिसी राबविण्याच्या योजनेविषयीची माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ब्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी रिलीज केली. मात्र, या वेळी व्हॉट्सअ‍ॅपने शब्द काळजीपूर्वक निवडले आहेत. ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी आपल्या पर्सनल चॅटिंगवर परिणाम करणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आपले पर्सनल चॅट व्हॉट्सअ‍ॅप देखील स्वतः पाहू शकणार नाही. कंपनीने म्हटले आहे की, त्याच्या प्लॅटफॉर्मवर पर्सनल मेसेज आणि कन्टेन्टची देवाणघेवाण एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केली जाईल.

चला तर मग व्हॉट्सअ‍ॅपने काय म्हटले ते जाणून घेऊयात …
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी फक्त बिझनेस अकाउंट्ससाठी जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘आम्ही आमची सर्व्हिस अटी आणि प्रायव्हसी पॉलिसी बदलत आहोत. हे बदल व्हॉट्सअ‍ॅपवर बिझनेस आणि त्यांच्या ग्राहकांमधील मेसेजिंगशी संबंधित आहेत. या नवीन पॉलिसीअंतर्गत कंपनी व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस युझर्सचे लोकेशन आणि कॉन्टॅक्ट लिस्ट घेऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपवर पर्सनल मेसेजचे आदानप्रदान एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅपचा दावा आहे की, व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या माध्यमातून दररोज दहा लाखाहून अधिक लोकं बिझिनेस किंवा व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. फोन कॉल किंवा ई-मेल करण्याची गरज नाही. या सेवा कस्टमर सेवा म्हणून मानल्या जातात आणि व्हॉट्सअ‍ॅप शुल्क व्यापाऱ्याकडून आकारले जातात. याद्वारे आपण फोन किंवा ईमेलपेक्षा जास्त वेगाने बोलण्यास सक्षम असाल. ते पूर्णपणे ऑप्शनल असेल.

सोशल मेसेजिंग अ‍ॅपने म्हटले आहे की” आम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात घेत असलेल्या बदलांची संपूर्ण माहिती आमच्या युझर्ससह शेअर करीत आहोत. आम्ही आपल्याला आपली माहिती कशी मॅनेज करावी ते सांगणार आहोत. आम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही नवीन सेक्शन जोडले आहेत आणि त्याबद्दल डिटेलिंग देखील केली आहे. आम्ही आमची पॉलिसी अगोदरच सुलभ केलेली आहे. आपण आपल्या अकाऊंटची माहिती आणि सेटिंग्जचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपने फोन स्क्रीनवरील जुन्या पॉलिसीच्या अपडेट्सचा इशारा दिला होता. तसेच, ते न स्वीकारणारे युझर्सचे खाते फेब्रुवारीमध्ये बंद करण्याचा इशारा देण्यात आला. व्हॉट्सअ‍ॅपच्या या हालचालीवर जेव्हा देशभरात निषेध व्यक्त केला गेला, तेव्हा कंपनीने माघार घेतली होती, परंतु आता पुन्हा ही पॉलिसी सुरू झाली आहे. जुन्या पॉलिसीमध्ये असे म्हटले गेले होते की,”युझर्सनी ही पॉलिसी स्वीकारली पाहिजे. ती 8 फेब्रुवारी 2021 पासून अंमलात येत आहे. जर कोणताही युझरने त्यास सहमती दिली नसेल तर आपण आपले अकाउंट वापरण्यास सक्षम होणार नाही.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.