दुग्धाभिषेकाच्या नावावर दुधाची नासाडी..? अभिनेत्री कविता कौशिक भडकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीमुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन अंतर्गत सर्व व्यवसाय आणि उद्योग धंदे बंद आहेत. परिणामी अनेक लोक एकवेळ अन्न किंवा पोटाला चिमटा काढून दिवस काढत आहेत. अश्यावेळी अभिनेता सोनू सूद आपल्या परीने शक्य तितकी सर्वप्रकारची मदत गरजू लोकांना करतो आहे. यामुळे त्याच्याप्रती आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी नुकताच आंध्रप्रदेशातील श्रीकलाहस्ती मध्ये त्याच्या फोटोला हार घालून दुग्धाभिषेक करण्यात आला होता. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. त्यात अभिनेत्री कविता कौशिकचाही समावेश आहे. याबाबत तिने चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षीपासून कोरोना काळात गरिबांना मदत करतो आहे. लोक त्याला अक्षरशः देव मानत आहेत. यामुळे आंध्रप्रदेशातील श्रीकलाहस्ती येथे चाहत्यांनी सोनू सूदच्या फोटोला हार घालून त्यावर दुधाचा अभिषेक केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री कविता कौशिक चांगलीच संतापली आहे. कविताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चांगलाच संताप व्यक्त केला आहे. तिने ट्विटरहॅण्डलवरून याबाबत बोलताना लिहिले कि, ‘आपण सगळेच सोनू सूदवर प्रेम करतो. संपूर्ण देश सोनू करत असलेल्या निस्वार्थ कामासाठी कायम त्याचा ऋणी राहील. परंतु, मला या गोष्टीची खात्री आहे की, जिथे एकीकडे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि लोक भुकेने मरत आहेत, तिथे सोनूदेखील अशा प्रकारे दुधाची नासाडी पाहून दुखी होईल. हे मूर्खपणाचं काम आहे. यातून पुढील पिढ्या कोणताही आदर्श घेऊ शकत नाहीत.

काही माध्यमांनी याबाबत तयार केलेल्या न्यूजवर देखील तिने नाराजी व्यक्त केली आहे. तसे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणत्याही सद्सद विवेक बुद्धी असणाऱ्या माणसाला हे पटण्याजोगे नाही. एकतर जिवंत माणसाच्या फोटोला हार चढविणे आणि दुसरी गोष्ट जेव्हा संपूर्ण देश एखाद्या महामारीच्या भयंकर काळातून जातोय, हतबल आणि गरीब लोकांना आपल्यासारख्या धडधाकट आणि मदत करण्यालायक लोकांची गरज आहे, तेव्हा आपण दुधासारख्या जीवनावश्यक गोष्टीची नासाडी करत आहोत.

खरंतर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटते कि श्रद्धेला आपल्या फायद्यासाठी वळविणाऱ्या लोकांना आपल्यासारखीच लोक प्रोत्साहन देतात का काय.. ? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूदच्या फॅन्सपैकी बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला मात्र सोनूने नम्रपणे त्यांच्या भावनांना आदर करीत हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत ‘नम्र’ असे लिहिले आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, असेही सोनूने म्हटले आहे.

Leave a Comment