Dettol ने रचला इतिहास! Lifebuoy ला मागे टाकत पहिल्यांदाच बनला जास्त विक्री करणारा साबण

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे सध्या हँडवॉशिंग साबणचा वापर वाढला आहे. इंडियन सोप मार्केटमध्ये बरेच बदल झाले आहेत. कोरोनामुळे, लोकांना साबणाने सतत हात धुण्याचे आवाहन केले गेले आहे जेणेकरुन कोणत्याही प्रकारचे जंतुसंसर्ग टाळता येईल. अशा परिस्थितीत, लोक जंतू नष्ट करण्यासाठी डेटॉल साबण वापरत आहेत. कोरोना संकटात डेटॉल साबणाची विक्री वाढली आहे. डेटॉल हा भारतातील सर्वाधिक विकला जाणारा साबण बनलेला आहे. डेटॉल साबण पहिल्यांदाच विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला. डेटॉलने पहिल्यांदा हिंदुस्तान युनिलिव्हर, लाइफबॉय आणि लक्स या दोन प्रसिद्ध ब्रँडसना मागे टाकले आहे.

जागतिक विक्री मध्ये आली तेजी
साबणाच्या कामगिरीबद्दल बोलताना, त्याची जागतिक विक्री ही 62 टक्क्यांनी वाढलेली आहे. डेटॉलच्या भारतीय बाजारातील वाटा 430 बेस पॉईंटने वाढला आहे. 2019 मध्ये इंडियन सोप मार्केटमध्ये लाइफबॉयचा वाटा13.1 टक्के होता, तर डेटॉलचा बाजारातील हिस्सा 10.4 टक्के होता. दुसर्‍या क्रमांकावर Godrej ब्रँड आहे ज्यांचा बाजारातील हिस्सा 12.3 टक्के होता. डेटॉलची बाजारपेठ गेल्या दोन वर्षांत लक्षणीयरित्या वाढलेली आहे. 2017 मध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये डेटॉलचा वाटा 7 .7 टक्के होता, जो 2019 मध्ये वाढून 10.4 टक्क्यांवर पोहोचला. डेटॉलची बाजारपेठ 430 बीपीएसने वाढली आहे. 1 bps हा बेस पॉईंटचा शंभरवा भाग आहे.

दुसर्‍या क्रमांकावर Godrej
या विभागातील दुसरे म्हणजे Godrej ब्रँड, ज्यांचा बाजारपेठ हिस्सा 2019 च्या कॅलेंडर वर्षात 12.3 टक्के होता. इंडियन सोप मार्केट सुमारे 22000 कोटी आहे. 2020 च्या पहिल्या सहामाहीत डेटॉल विक्रीत सुमारे 500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Lifebuoy चा बाजारातील हिस्सा कमी झाला
2017 मध्ये Lifebuoy चा बाजारातील हिस्सा 15.7 टक्के होता. दोन वर्षांत 2019 मध्ये ती घटून 13.1 टक्के झाली. दुसरीकडे, डेटॉलचा बाजारातील वाटा वाढला आहे. डेटॉल साबण हा यूके हेल्थकेअर आणि कंझ्युमर गुड्स निर्माता रेकिट बेंकीझरचा ब्रँड आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here