प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या वेळी उपस्थितांनी काळे झेंडे दाखवल्याने गोंधळ मजला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताना अगदी सुरुवातीला हा गोंधळ झाल्याने मुख्यमंत्र्यांना भाषण करताना व्यत्यय निर्माण झाला.  अमरावती येथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेला  आले असता प्रकल्पग्रस्थांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.

अमरावती विदर्भातील लोकसभेची महत्वाची जागा म्हणून गणली जाते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा शिवसेनेकडून लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात नवनीत राणा या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. गेल्यावेळी नवनीत राणा यांच्या विरोधात आनंदराव अडसूळ यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे निवडणूक गाजली होती. यावेळी देखील नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्या समोर तगडे आव्हान उभा केले आहे. त्यामुळे हि निवडणूक रंगतदार होणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाषणावेळी काळे झेंडे दाखवणाऱ्या लोकांमध्ये आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाले असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.