अण्णांच्या मनधरणीसाठी फडणवीस राळेगणसिद्धीत ; पण अण्णा उपोषणावर ठाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे.दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या अशी प्रमुख मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे,

दरम्यान, अण्णांच्या मनधरणी साठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत. फडणवीसांनी अण्णा हजारे यांची घेतली भेट घेतली असून दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. 30 जानेवारी रोजी अण्णा हजारे केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार आहेत. अण्णांनी हे आंदोलन करु नये यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी सुरु आहे.

फडणवीस म्हणाले, अण्णा हजारे यांचं मत आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. त्या केंद्र सरकारपुढे मांडणार आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. अण्णांचे विषय मार्गी लागावे ही आमचीही इच्छा आहे. अण्णांच्या पत्राचे उत्तर चर्चा करुन द्यावं लागतं त्यामुळे उत्तर दिलं नाही. अण्णांना उत्तर द्यायचं आहे, असं खुद्द केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं असल्याचंही फडणवीस म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment