धुळे | केरळ मधील पूरानंतर महाराष्ट्राने तेथील जनतेसाठी मदतीचा हात पुढे करत सर्वात मोठे आरोग्य शिबीर भरवले होते असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी धुळे येथे केले. शासनाच्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाला एक महिन्याच्या आत सीटी स्कॅन व MRI मशीन उपलब्ध करून देण्याची तसेच शहरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी अक्कलपाडा धरणातून पाणी आणण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. गरीब रूग्णांना अनेक आजारावरील उपचार करणे परवडत नाही परंतु राज्य शासन महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरीब रूग्णांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम करत आहे असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 16, 2018
गरीब रूग्णांना अनेक आजारावरील उपचार करणे परवडत नाही परंतु राज्य शासन आता या रूग्णांवर करीत आहे उपचार. #महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरीब रूग्णांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis pic.twitter.com/LxJnUyaHfC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 16, 2018
गरीब आणि गरजू रूग्णांना सर्व आजारांवरील उपचार एकाच ठिकाणी देण्यासाठी अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन. #केरळ राज्यात सर्वात मोठे आरोग्य शिबीर #महाराष्ट्र राज्याने @girishdmahajan यांच्या प्रयत्नातून भरवले- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis pic.twitter.com/6Za0UGTtrK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 16, 2018