हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेला खिंडार पाडून राज्यात शिंदे- भाजपा सरकार स्थापन झाले. पण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. विरोधकांनी तर यावरून फडणवीसांची खिल्लीही उडवली. मात्र आपण उपमुख्यमंत्री का बनलो याच खर कारण आज त्यांनी सांगितले.
आज नागपूर येथे होम पीचवर फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ज्यांनी मला मोठं केलं त्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने मला उपमुख्यमंत्री बनायचा आदेश दिला म्हणून मी उपमुख्यमंत्री बनलो. पक्षाने सांगितले असत तर मी घरी सुद्धा बसलो असतो. पण माझ्या नेतृत्त्वाने सांगितलं की, तू १०६ आमदारांचं नेतृत्त्व करतो आहेस. त्यामुळे तुला जबाबदारी स्विकारावी लागेल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 5, 2022
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनर वरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता. त्यामुळे फडणवीस आणि शाह यांच्यात काही मतभेद आहेत का अशा चर्चाना उधाण आले होते. यापूर्वी मुंबई कार्यालयात लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शहा गायब असल्याचे दिसून आले. कधी नव्हे ते अमित शाहांचा फोटो बॅनर करून गायब झाल्याने भाजपमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.