हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विविध राजकीय विषयांवर दोन्ही नेत्यांनी भाष्य केलं तसेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार याबाबतही माहिती दिली. याच दरम्यान, शिवसेनेचे नेमके किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत असा सवाल पत्रकारांनी केला असता फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला.
शिवसेनेचे किती खासदार तुमच्या गटात येणार आहेत किंवा किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत असा सवाल पत्रकारांनी एकनाथ शिंदे याना केला. यावेळी शिंदेनी थेट उत्तर देणं टाळलं. मात्र फडणवीसांनी मात्र एक खासदार नक्की आमच्या संपर्कात आहे ते म्हणजे श्रीकांत शिंदे असं म्हणताच सगळीकडे हशा पिकला. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असून ते ठाण्याचे खासदार आहेत.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप हे आषाडी एकादशी नंतर होईल. मी आणि देवेंद्र फडणवीस उद्या आषाडी एकादशीला जाईन. त्यानंतर मुंबईत आम्ही बैठक घेऊन चर्चा करू आणि मंत्रिमंडळ खातेवाटप बाबत निर्णय घेऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच आमचा गट हीच खरी शिवसेना आहे असा पुनरुच्चारही एकनाथ शिंदे यांनी केला.