हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला दिसत आहे. नगरविकास खातं वगळता शिंदे गटाकडे विशेष असं महत्त्वाचे खाते दिसत नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे असलेलं गृह आणि अर्थखाते आहे. याशिवाय यासह विधी आणि न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्ठाचार ही खातीही फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवली आहेत. येव्हडच नव्हे तर फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास खात्यासह पंचायत राज खात, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण ही खाती आहेत, तर अतुल सावे यांच्याकडे सहकार खाते, सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावणारे रवींद्र चव्हाण याना बांधकाम खातं देण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस हे अधिक पॉवरफुल झाले आहेत.
पहा संपूर्ण खातेवाटप-
एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, परिवहन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन
देवेंद्र फडणवीस- उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ, जलसंपदा, राजशिष्टाचार, गृहनिर्माण, उर्जा, विधी आणि न्याय
विखे पाटील- महसूल खाते, पशु संवर्धन, दुघविकास
सुधीर मुनगंटीवार- वनमंत्री, सांस्कृतिक कार्य व मस्त्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्र शिक्षण खाते, वस्त्रोद्योग,
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना
विजयकुमार गावित- आदिवासी विकास खात
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा मंत्री
संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन खात
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
दादा भुसे- बंदरे आणि खनिकर्म खात
सुरेश खाडे- कामगार मंत्री
गिरीश महाजन- ग्रामविकास आणि पंचायत राज खात, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण
रवींद्र चव्हाण- बांधकाम मंत्री
दीपक केसरकर- शालेय शिक्षणमंत्री
तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
उदय सामंत- उद्योग मंत्री
अतुल सावे- सहकार मंत्री
अब्दुल सत्तार- कृषी मंत्री
मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजगता खातं