मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे. त्यांच्या या भेटीबाबाब शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता एक दिवस फडणवीस मातोश्रीवर पण येतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही’ असे मोजकेच पण महत्त्वाचे उत्तर फडणवीस यांनी दिले. तर त्याआधी परभणी येथे बोलताना संजय राऊत यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे फडणवीस म्हणाले होते

संजय राऊत नक्की काय म्हणाले –

विरोधी पक्ष हळूहळू जमिनीवर येऊ लागला आहे. राजकारणात कायमचा शत्रू कुणीच नसतो. केवळ वैचारिक मतभेद असतात. पण, लोकशाहीत संवाद असायला हवा. सरकारनं विरोधकांशी आणि विरोधकांनी सरकारशी बोलत राहायला हवं. महाराष्ट्रात ही परंपरा चालत आली आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असे राऊत म्हणाले होते. त्यानंतर भाजपमधून त्यावर उत्तरादाखल प्रतिक्रिया येत आहेत.