नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक झाल्याचे बोलले जात आहे. सदर बैठक बंद दरवाजात झालेली असल्याने राजकिय वर्तुळात याबद्दल उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.
तातडीने घेण्यात आलेल्या या बैठकीत संघाचे वरिष्ठ मंडळी सामील झाले होते. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या बैठकीत आगामी निवडणुकीत नाराज मित्र पक्ष शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाल्याचे कळाले. ही गोपनीय बैठक संध्याकाळी ७ ते रात्री ९:३० अशी तब्बल अडीच तास चालली.
आगामी लोकसभा आणि विधान सभा निवडणूक लक्षात घेता संघ मुख्यालयात घेण्यात आलेल्या या तातडीच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत संघ प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते की नाही या बद्दल कुठलीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
तर सरकारी कार्यालयांमधेही भरणार संघाच्या शाखा
तुम्ही हे सरकार खाली का नाही खेचत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा RSS ला सवाल