एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चार महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन शिवसेना पक्षातून बंड केल्यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत हातमिळवणी करत युती सरकारची स्थापना केली. दरम्यानच्या काळात भाजपकडे जास्त आमदार असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने राज्यातील जनतेसह सर्वच क्षेत्रातील जाणकारांना मोठा धक्का बसला. दरम्यान एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय कोणी घेतला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले फडणवीस?
सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी- 20 सामन्याप्रमाणे घडत होत्या. जसजसा वेळ पुढे जात होता तस तसे कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी बदलत गेल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता असे फडणवीस (Devendra Fadanvis) एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, हा माझा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, हा माझ्यासाठी धक्का नव्हता. पण मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता असेदेखील फडणवीस यावेळी म्हणाले. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा माझ्याशी चर्चा केली, तेव्हा ते या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे मी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असे ते म्हणाले.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती