Maharashtra Budget 2023 : मुलीच्या जन्मानंतर 5 हजार तर 18 वर्षांनंतर 75 हजार देणार; फडणवीसांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्याचे  (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) विधानभवनात सादर केला. यावेळी त्यांनी सर्वच क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मुलीच्या जन्मानंतर 5 हजार तर 18 वर्षांनंतर 75 हजार देणार आहे.

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकार कोणत्या घोषणा करणार? | Vidhansabha Live

राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ‘लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्यानंतर 5 हजार रुपये, देण्यात येणार आहेत. मुलगी चौथीत असताना 4000 , सहावीत असताना 6000 आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8000 रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख मिळतील अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या या घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवून स्वागत केलं.

याशिवाय महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येणार आहे. महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार अशी घोषणा फडणवीसांनी केली.

शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार

केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकार सुद्धा पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 जाहीर रुपये देणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना फडणवीसांनी जाहीर केली आहे. या योजेनच्या माध्यमातून सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देण्यात येतील. यामुळे आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्य सरकारचे 6 हजार असे वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळतील. महाराष्ट्रातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.