हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. या दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र राज्यामध्ये बदल्याचा जो महाघोटाळा झाला. पोलीस बदल्यांमध्ये झाला. या महाघोटाळ्याची सर्व माहिती केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर न्यायलयाने महाघोटाळा चौकशी सीबीआयला सोपवली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं यावर शिक्कामोर्तब केलं. महाघोटाळा मी जर बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा दबून गेला असता. मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यांमध्ये बदल्याचा जो महाघोटाळा झाला. त्या बदल्याची माहिती मी केंद्र सरकारकडे पोहचवली. त्यामुळे माझी आज चौकशी लावली. मी जो पेन ड्राइव्ह दिला तो केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. मी जी कागदपत्रे दिली ती नवाब मलिक यांनी सर्वांना दिली. त्यानंतर त्याची चौकशी झाली. मी जर आज महाघोटाळा काढला नसता तर जनतेला तो कळला नसता हा महाघोटाळा सहा महिने या सरकारने दाबून ठेवला. मला ऑफिशियल सिक्रेसी अॅक्टचा भंग केल्यासारखे प्रश्न विचारले गेले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीपरिषद पत्रकार https://t.co/5j24hUo3Th
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 13, 2022
मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती, त्याचं उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मी त्यांनी मला पोलीस स्टेशलनला उपस्थित राहण्याचं नोटीस देण्यात आलं. मला नोटीस देण्यात आल्यावर मी जाणार असल्याचं सांगितलं. यानंतर सहपोलीस आयुक्त यांनी मला फोन करुन पोलीस घरी येतील असे सांगितले. मी जबाबदार व्यक्ती सारखा वागलो. मी त्यासंदर्भातील ट्रान्सस्क्रीप्ट आणि पेनड्राईव्ह मी केंद्रीय गृहसचिव यांना दिली.