आता बहाणेबाजी बंद करा; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आज त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. आघाडी सरकारनंही केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वत: मदत करावी, राज्य सरकारने बहाणेबाजी बंद करावी, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी पश्चिम महाराष्ट्राचा तीन दिवसीय दौरा सुरु केला आहे. त्या दृष्टीने काल सातारा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज सांगली जिह्यात ते पोहचले. या दौऱ्यावेळी पुरस्थितीची पाहणी करताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला. तर महाविकास आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडले.

 

यावेळी फडणवीस म्हणाले की, सांगली जिल्ह्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलसंपदा खात्याच्या चुकलेल्या अंदाज अंदाजामुळेच यंदा अधिक नुकसान झाले आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या पूरस्थितीबाबत वडनेरे समितीने जो अहवाल तयार केला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेची आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची तातडीने कार्यवाही करावी.

Leave a Comment