अंगणवाडी- आशा सेविकांच्या मानधनात घसघशीत वाढ; ‘इतका’ पगार वाढणार

devendra fadnavis maharashtra budget aasha sevika
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra Budget 2023) केला. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी अंगणवाडी आणि आशा सेविकांना मोठा दिलासा देत त्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली आहे. तसेच अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची एकूण 20 हजार पदे भरणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

सध्या राज्यातील आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन हे 3 हजार 500 रुपये आहे. तर गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन हे 4 हजार 700 रुपये एवढे आहे. या मानधनात 1500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच अंगणवाडी सेविकांचं मानधन हे 8 हजार 325 वरून 10 हजार रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार 975 वरून 7 हजार 200 रुपये करण्यात येत आहे. याशिवायअंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे 4425 वरून 5500 रुपये करण्यात आले आहे, अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे.

महिलांसाठी फडणवीस यांनी अन्य कोणत्या घोषणा केल्यात आहेत?

मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार

महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

महिलांना एसटी प्रवास करताना ५० टक्के तिकीट सवलत

चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार

मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये देणार

मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये देणार

शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार

केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकार सुद्धा पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ जाहीर रुपये देणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना फडणवीसांनी जाहीर केली आहे. या योजेनच्या माध्यमातून सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येतील. यामुळे आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे ६ हजार आणि राज्य सरकारचे ६ हजार असे वर्षाकाठी एकूण १२ हजार रूपये मिळतील. महाराष्ट्रातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.