हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला होता. तसेच याबाबत SIT स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. तलाठी भरती परीक्षा अतिशय पारदर्शकपणे पार पडली आहे. तरीही वडेट्टीवार याना यामध्ये गैरव्यवहार झाला असं वाटत असेल तर त्यांनी याप्रकरणी पुरावे सादर करावेत, पुरावे आढळल्यास परीक्षा रद्द करू असं फडणवीस यांनी म्हंटल आहे.
पुण्यातील भाजपच्या नव्या कार्यालयाला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी फडणवीस यांना तलाठी भरती बाबत विचारण्यात आले. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी गैरव्यवहाराबद्दल पुरावा दिला तर नक्कीच चौकशी केली जाईल. फक्त स्टेस्टमेंट्स करून चौकशी होत नाही. तलाठी भरती परीक्षा ही संपूर्ण राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. त्यामुळे त्यांनी पुरावे दिल्यास याची चौकशी सुद्धा होईल आणि तलाठी भरती परीक्षाही रद्द होईल असं फडणवीस यांनी म्हंटल.
राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा भाजपचा नव्हे तर राम भक्तांचा, कारसेवकांची, रामावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. श्रद्धा असलेला प्रत्येक जण या सोहळ्यासाठी जात आहे. अक्षता देत आहे, त्यामुळे याबद्दल कोणालाच दु:ख होण्याचे कोणतेच कारण नाही असं म्हणत फडणवीसांनी राम मंदिरावरून विरोधक करत असलेल्या टीकेला सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले आहे.