हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात लेखी मागणी केली.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे एसीबीने भूखंड घोटाळ्यात कोणाची चौकशी करणं आवश्यक आहे, याची यादीच सरोदेंनी न्यायालयात दिली
ज्यांचे जबाब लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान घेणे अपेक्षित होते ते घेतले नाही, मोठमोठ्या रकमा ज्यांनी एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे व त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या खात्यात जमा केल्या, फिरवल्या त्या अनेक बनावट कंपन्या तसेच अनेक सरकारी अधिकारी यांचे जबाब नोंदविण्यात आले नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया शंकास्पद आहे. कुणाचे जबाब घेणे कायद्याच्या दृष्टीने का? आवश्यक होते याची एक यादीच ॲड. सरोदे यांनी न्यायालयात सादर केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’