हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका काल पार पाडल्या. या निवडणुकीत प्रभारी म्हणून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पडली. त्याबद्द्ल भाजपच्यावतीने मुंबईत आज त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेश देताना सूचक असे विधान केले. “महाराष्ट्रात आता आगामी निवडणुकीत 2024 मध्ये भाजपचेच सरकार येणार आहे. हे सरकार येणार आणि सत्तांतर होणार हे अटळ आहे,” असे फडणवीस यांनी यावेळी म्हंटले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, सुधीर मुंनगंटीवार, केंद्रीयमंत्री कपिल पाटील हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले की, “कालच्या निवडणुकीनंतर जो संपूर्ण देशाने बदल पाहिला. “मोदी है तो मुमकिन है, असा विश्वास जनतेला वाटत आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी सामान्य माणसाच्या मनात अजूनही मोदीच आहेत.
गोवा विधानसभा निवडणूक विजयाचे शिल्पकार मा. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य स्वागत समारंभ. https://t.co/oeR0BEhYWW
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 11, 2022
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, फडणवीस यांनी कमी काळात अधिक चांगली राजकीय कारर्कीद तयार केली. भाजपाचा माणूस मोठा झाला याचा आम्हाला अभिमान आहे. फडणीस यांनी कमी वयात नगरसेवक, कमी वयात आमदार, कमी वयात मुख्यमंत्री आणि कमी वयात प्रभारी अशी पदं पार पाडली आहेत.
अभी तो असली लढाई मुंबई में होगी – देवेंद्र फडणवीस
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. यावेळी फडणवीस म्हणाले की, विजयाने हुरळून जायचे नाही, विजयाने नम्र व्हायचे आहे. विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.