आता भाजपचे पुढचे मिशन लोकसभा; देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती

Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीनंतर भाजपकडून विधान परिषदेच्या जागेवर विजयाचा दावा केला जात आहेच शिवाय पुढील लोकसभेच्या निवडणुकीचीही तयारी केला जात आहे. भाजपच्या आज पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश वरिष्ठ व्यक्तींनी दिले आहेत. त्यानुसार 48 मतदार संघात भाजपकडून तयारी केली जात असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले कि, राज्यात ज्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजप पराभूत झाली आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमले जाणार आहे. त्या दृष्टीने भाजपा जिल्हाध्यक्षांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. केंद्रातील सर्व योजना आपल्या जिल्ह्यात घरोघरी राबवणे. लोकसभा निवडणूक संदर्भात जे काही कार्यक्रम असतील ते तंतोतंत राबवणे, असे आदेश नेते आणि कार्यकर्त्यांना आजच्या बैठकीत देण्यात आले आहे.

https://www.facebook.com/watch/?v=544818530352291

पुढची काळात जी लोकसभा निवडणूक येणार आहे. त्या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. त्यासाठी आम्ही राज्यात एक समिती नेमली आहे. आणि त्या समितीची जबाबदारी पक्षातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यवर सोपवण्यात आली आहे. आम्ही पुढील 18 महिन्यात काय करायचे? काय करायचे नाही अशा गोष्टीचे नियोजन आखले आहे. येणाऱ्या निवडणुकीत 48 मतदारसंघात आम्ही ताकदीने नक्की जिंकू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुढील महिन्यात केंद्रीय मंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुढील महिन्यात केंद्रीय मंत्र्यांकडून महाराष्ट्राचा दौरा केला जाणार असल्याचे सांगितले. केद्रांची सर्व मतदारसंघावर बारीक नजर असून याचा आढावा जिल्हाध्यक्ष यांनी घ्यायचा आहे. राज्यातील एकूण 18 लोकसभा मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. 16 लोकसभा मतदार संघामध्ये जुलै महिन्यात केंद्रीय मंत्र्याचा दौरा होणार असून त्या दृष्टीने तयारीही केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.