‘नाथाभाऊंना राजकारण नीट कळतं, ते योग्य निर्णय घेतील’; खडसेंच्या पक्षांतरावर फडणवीसांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जामनेर । आपल्यावर झालेल्या अन्यायाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे उघड आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे” असं सूचक उत्तर फडणवीस यांनी जामनेर दौऱ्यात दिले.

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरावर आपले मत व्यक्त केले. तसेच, मदिरालय सुरु करणाऱ्या राज्य सरकारला मंदिरे खुली करण्याचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवरही टीका केली.

“खडसेंशी चर्चा करु”
“नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्हा सर्वांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण देखील नीट समजते. मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी नाथाभाऊंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन. मला वाटते ते योग्य निर्णय घेतील” असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis reacts on BJP Leader Eknath Khadse possibly quitting party)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”