बेळगावात मराठी माणसाचा नव्हे तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव; फडणवीसांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. बेळगाव मध्ये मराठी माणसाचा पराभव झाला असताना तुम्ही पेढे वाटताय?? तुम्हाला लाज नाही वाटत अशी टीका राऊतांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झाला नसून संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिलंय.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-

बेळगाव मध्ये मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटताना लाज नाही वाटली का?? अशा कडक शब्दांत त्यांनी टीका केली होती. बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल आज महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा झाला नाही असे संजय राऊतांनी म्हंटल होत.