शिवसेनेला मोठा झटका! धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचे नावसुद्धा वापरता येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (shivsena symbol) गोठवलं आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह (shivsena symbol)वापरता येणार नाही. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यामुळे आता नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन (shivsena symbol) सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. यानंतर शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

तसेच ठाकरे गटाकडून आपण सगळे कागदपत्रे सादर करु, पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीत देखील शिवसेनेकडून तीन आठवड्यांचा वेळ मागवण्यात आला होता. मात्र निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला खडे बोल सुनावले. यानंतर दोन्ही गटाला 24 तासांचा वेळ देण्यात आला होता. यानंतर निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या बैठकीत पक्षचिन्ह (shivsena symbol) गोठवण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश :
1) दोन गटांपैकी कोणालाही शिवसेना नाव वापरता येणार नाही.

२) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात.

4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि

यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो

आयोगाने मंजूर केलेले आणि;

(ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर

संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.

त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!