सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे नियमित मंजूर रिक्त पदावर जुने व अनुभवी वीज कंत्राटी कामगार काम करत आहेत. एजन्सी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात असून कामावरुन कमी करू नये. तसेच नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टदार संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सातारा अध्यक्ष दिलीप मारुती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सातारा येथे नवीन टेंडर प्रक्रिया राबवताना काही कंत्राटदारांना आर्थिक हेराफेरीसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी लाभलेली आहे या प्रकरणात जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या कंत्राटदारांलाच महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालया अंतर्गत सातारा जिल्ह्यात कंत्राटी कामगार पुरवण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे.
सातारा येथील एका बड्या संघटनेशी संबंधित वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्थाचालक कंत्राटदाराला महावितरणच्या बड्या अधिकाऱ्यांच्या अभयामुळेच पुन्हा टेंडर मिळालेले आहे. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर लक्ष घालण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केली आहे.