आ. जयकुमार गोरेंचे भाकित : यंदाच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विठ्ठलाची पूजा करतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार गुजरात येथे असल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी यंदाच्या आषाढी वारीला देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे भाकीत केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

आज महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याने राजकारणात तर्कवितर्क लढविले जात आहे. अशातच भाजपच्या नेत्याकडून लवकरच पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला जावू लागला आहे. साताराचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेचे नियोजन सुरू असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील माण- खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनीही याबाबतीत भाकित केले आहे.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार अस्थित झाले आहे की नाही, यावर माझी प्रतिक्रिया एवढीच आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा होतील, याबाबतची लवकरच बातमी येईल. यंदाची आषाढी एकादशीची विठ्ठलाची पूजा ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.