BREAKING : देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा! धावती रेल्वे सिग्नलला कापड बांधून थांबवली अन…

0
168
Devgiri Express Robbery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । देवगिरी एक्सप्रेसवर ८ ते १० जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा (Devgiri Express Robbery) टाकल्याची धक्कादायक घटना आज मध्यरात्री घडली आहे. औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने जाताना धावत्या देवगिरी एक्स्प्रेसला सिग्नलवर कापड बांधून थांबवून प्रवाशांना लुटण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रच हादरून गेला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी मध्यरात्री पोटुळ येथील रेल्वे स्थानकाजवळ ८ ते १० दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून धावती रेल्वे थांबवली. त्यानंतर सशस्त्र दरोडेखोरांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरवात केली. रेल्वे डब्बा S५ ते S९ वर दरोडेखोरांनी जोरदार दगडफेक केली. मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. Devgiri Express Robbery

प्रवाशांना धारदार शास्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लूटमार केली आहे. हे दरोडेखोर अँब्युलन्सने आल्याची चर्चा आहे. ज्यावेळी हा सर्व प्रकार घडत होता त्यावेळी जवळच एक एम्ब्युलन्स देखील उभी होती. मध्यरात्री घडलेला हा प्रकार जवळपास अर्धा तास सुरु होता. यामध्ये दरोडेखोरांनी एका महिलेची सोन्याची चैनही लुटली आहे. तसेच अनेकांचे मोबाईल काढून घेतला आहे.

दरम्यान, यापूर्वीही औरंगाबाद येथे मुंबई नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेला अशाचप्रकारे थांबवून लुटण्यात आले होते. नंतर त्याचदिवशी नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वेला थाम्बवूनही लूटमार करण्यात आली होती. दरोडेखोर अर्धा तासात लूटमार करून पोबारा करत असल्याचं या घटनांवरून लक्षात येत आहे. राज्यातील रेल्वे गाड्या लुटण्याच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here