बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत.
‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. सोबत पोस्ट केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या तस्वीरीसमोर लीन झालेले दिसत आहेत.
आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2019
संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा…
सदैव आपल्या आठवणीत!
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏 pic.twitter.com/0gtmcxZ9h1
विशेष म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंडेंच्या औरंगाबादमधील स्मारकाचं काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती धनंजय मुंडेंनी काल ट्विटरवरुन दिली होती.