धनाभाऊंचे पंकजा ताईंना ओपन चॅलेंज, ‘ट्रम्प जरी आणले तरी माझा विजय निश्चित’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. तर दुसरीकडे १८ तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.

“उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवसापासून भाजपने जो धसका घेतलाय, ते आणखी त्यातून बाहेर निघालेले नाहीत. त्यांना वाटलं की मोदी आल्याशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. हे कळाल्यावर मी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला म्हणालो, मोदी मागच्या महिन्यात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराला गेले होते. १७ ला मोदी येत आहेत, १९ ला ट्रम्प जरी आणले तरी विजय कुणीही रोखू शकत नाही अशी परिस्थिती आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

पंकजा मुंडे राजकीय खेळी करण्यात आतापर्यंत धनंजय मुंडेंवर वरचढ ठरल्या असल्या तरी खऱ्या लढाईची प्रतिक्षा आहे. धनंजय मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करत भावनिक साद घालणं सुरु केलंय. तर पंकजा मुंडे दिवसभर राज्यभरातील भाजप उमेदवारांचा प्रचार करुन सायंकाळी परळीत स्वतःचा प्रचार करतात. धनंजय मुंडेही परळीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

इतर काही बातम्या-

 

Leave a Comment