धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं; राष्ट्रवादी नेत्याचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार असून त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते.

गोपीनाथ मुंडे हे आमचे श्रद्धास्थान आहेत. मुंडे साहेबांनी महाराष्ट्र मध्ये आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण करत असताना धनंजय मुंडे सारखा युवा कार्यकर्ता तयार केला. आमची अपेक्षा आहे की गोपीनाथ मुंडे यांनी जी शिकवण दिली, त्यांचा हा वारसा असाच राजकीय दृष्ट्या कायम ठेवावा. या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं, सर्व समाजांचे नेतृत्व करावे, अस एकनाथ खडसे म्हणाले.

यावेळी त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्या वर निशाणा साधला. मी अनेकदा उल्लेख करतो की, मुंडे साहेब महाराष्ट्रात असते तर राज्यातील राजकीय परिस्थिती खूप बदलली असती. राज्यातील मुख्यमंत्री पद बदललं असत. महाराष्ट्रात जे तुम्ही 5-6 वर्षात अनुभवल आहे ते तुम्हांला पाहायला मिळालं नसत अस खडसे म्हणाले.

Leave a Comment