चाळीसगाव प्रतिनिधी | भाजप ने २०१४ साली आश्वासनांचा पाऊस पाडत तरुण वर्गाला अनेक स्वप्न दाखवली. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करू आणि अच्छे दिन आणू असा वादा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दिला. मात्र मागील चार वर्षात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर “२०१४ साली मोदींच्या भूलथापांना बळी पडलेली तरुणाई आता भाजप च्या मागील चार वर्षांत साधी एक सोयरीक सुद्धा आली नाही म्हणून ओरड करत आहे” असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आ. धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. चाळीसगाव येथील परिवर्तन यात्रेच्या आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
“२०१४ साली देशातील तरुण वर्ग नरेंद्र मोदींची भाषणे ऐकून हवेत गेला होता. हर हर मोदी, घर घर मोदी अशा घोषणा देऊ लागला होता. आम्ही तेव्हा आरं आमचं ऐका म्हणत होतो. पण कोणी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मात्र आता तरुणांना मोदी सरकारचा खरा चेहरा कळला आहे. २०१४ साली दिलेली आश्वासने किती पोकळ होती याची जाणीव आता तरुणांना झाली आहे. त्यामुळे आता जेव्हा हि तरुणाई कुठे भेटते तेव्हा भाजप च्या चार वर्षात साधी एक सोयरीक सुद्धा आली नाही अशी ओरड करते” असं मुंडे यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले. नरेंद्र मोदिंनी तरुण वर्गाची फसवणूक केली आहे असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला.
तसेच, सोलापूर येथील भाषणात नरेंद्र मोदी यांनी “मी देशाचा असा चौकीदार आहे जो रात्री सुद्धा झोपत नाही, चोरांना पकडतो” असं विधान केले होते त्याचा समाचार घेतला. “मोदी जेव्हा मी चोरांना पकडतो असं म्हणत होते तेव्हा त्यांच्या पाठीमागे पणन मंत्री सुभाष देशमुख बसले होते ज्यांनी २५०० कोटी रुपये खाल्ले आहेत” असं म्हणून मुंडे यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका केली. दरम्यान आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जनता भाजप सरकार ला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील मुंडे यांनी व्यक्त केला.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?- धनंजय मुंडे
प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा
ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेवरुन धनंजय मुंडेंनी धरले सरकारला धारेवर