धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; बुधवारी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.

याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. धनंजय मुंडे हे करोनाची बाधा होणारे राज्य सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे.

यामध्ये त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि बीडच्या वाहन चालकाचा समावेश आहे. काल रात्री धनंजय मुंडे यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट आला. राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्याचवेळी आता राज्यातील मंत्रीही करोनामुळे बाधित होत आहेत. मंत्रालयातील काही सचिव, अधिकाऱ्यांनाही या व्हायरसची बाधा झाली होती. धनंजय मुंडे यांनी चार दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात करोनाची टेस्टिंग करणाऱ्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले होते.

Leave a Comment