हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diabetes : सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांचे राहणीमान आणि जीवनाशैलीत मोठा बदल झाला आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच अनेक जणांना विविध आजारांनी ग्रासले जात आहे. अशातच हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटिज (Diabetes) होणे हे अगदी सामान्य आजार झाले आहे. अनेक लोकांमध्ये हाय ब्लड शुगरची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रक्तातील वाढलेल्या साखरेला हायपरग्लाइसेमिया असेही म्हणतात. आज आपण अशा काही लक्षणांबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुमच्या रक्तातील साखर वाढल्याचे दिसून येते.
1. खूप तहान लागणे
तहान आणि भूक वाढणे हे रक्तातील साखर वाढल्याची सामान्य लक्षणे आहेत. आपण दिवसभरात किती खातो किंवा पाणी पितो हे महत्त्वाचे नाही. जर एखाद्याला सारखी तहान आणि भूक लागत असेल तर ते उच्च रक्तदाबाचे (Diabetes) लक्षण असू शकेल. वास्तविक, जेव्हा स्नायूंपर्यंत साखर जास्त प्रमाणात पोहोचते तेव्हा शरीर डिहाइड्रेट होते आणि तहान लागते. यानंतर, तुमचे शरीर रक्त पातळ करण्यासाठी आणि ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी शरीराच्या टिश्यूज मधून लिक्विड बाहेर काढते, ज्यामुळे आपल्याला तहान लागते.
जर खाल्ल्यानंतरही खूप भूक लागत असेल. तर यामागील कारण म्हणजे आपल्या स्नायूंना आवश्यक असलेली ऊर्जा अन्नातून मिळत नाही. यावेळी शरीराची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता ग्लुकोजला स्नायूंपर्यंत पोहोचण्यास आणि ऊर्जा देण्यापासून रोखते. त्यामुळे शरीराला जास्त ऊर्जा लागते आणि त्याच्या परीणामी आपल्याला भूक लागते.
2. अंधुक दिसणे
जर आपल्याला स्पष्ट दिसत नसेल तर ते हायपरग्लाइसेमियाचे लक्षण असू शकते. प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्तीला टाइप 2 मधुमेह (Diabetes) आहे असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे जर एखाद्याला अंधुक दिसत असेल तर ते हाय ब्लड शुगरचे लक्षण असू शकते. टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथी आणि डायबेटिक मॅक्युलर एडीमा सारखे डोळ्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो.
3. लघवीतुन गोड वास येणे
जर एखाद्याच्या लघवीतून गोड वास येत असेल तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप वाढल्याचे लक्षण आहे, असे तज्ञ म्हणतात. सामान्यतः, लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडणाऱ्या साखरेचे प्रमाण शोधता येत नाही. मात्र, जर एखाद्याच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर ती साखर किडनीद्वारे रक्तातून आणि लघवीद्वारे बाहेर पडते.
4. वजन कमी होणे
जर एखाद्याचे वजन अचानक खूप कमी झाले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण तज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्याचे वजन खूप लवकर कमी झाले तर ते हाय ब्लड शुगरचे लक्षण असू शकेल. जर आपलेही वजन अचानक कमी होऊ लागले असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
5. थकवा
जर एखाद्या व्यक्तीला सतत थकवा येत असेल तर ते हाय ब्लड शुगरचे (Diabetes) लक्षण असू शकते. यासाठी तुम्ही ताबडतोबडॉक्टरांशी संपर्क साधावा. आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये सतत चढ-उतार होत असते. मात्र जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते तेव्हा पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मिळत नाहीत, त्यामुळे पेशी नीट काम करू शकत नाहीत आणि परिणामी थकवा जाणवतो.
हे ही वाचा Diabetes Symptoms : तोंडातील ‘या’ दोन गोष्टी डायबेटिसची लक्षणं; वेळीच व्हा सावध