मदतीचं बक्षीस मिळालं का ? रंजन गोगोईंच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसींची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मदतीचं बक्षीस मिळालं का ? असं म्हणत माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे. न्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावर नागरिकांचा कसा विश्वास बसेल, बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा आशयाचं ट्विट करत ओवेसी यांनी टीका केली आहे.

दरम्यान सोमवारी रंजन गोगोई यांची सरकारने राज्यसभेवर निवड केली. याबाबतची अधिसूचना गृहमंत्रालयाने जारी केली. राष्ट्रपती नियुक्त सदस्यांपैकी एकाच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. काँग्रेसचे केटीएस तुलसी यांच्या निवृत्तीमुळे ही जागा रिक्त झाली होती. असं ही अधिसूचनेत म्हंटल आहे.

ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला निकाल देणाऱ्या पाच सदस्यांच्या खंडपीठाचे अध्यक्ष गोगोई हे होते. त्याच महिन्यात १७ तारखेला ते निवृत्त झाले. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी न्या. गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली होती. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश आणि राफेल विमान खरेदीचा व्यवहार यांसारख्या प्रकरणांत निकाल देणाऱ्या खंडपीठांचेही ते प्रमुख होते.

Leave a Comment